खंबाटकी घाटात मुंबईहून वाईला जाणा-या कारला आग; लाखोंचे नुकसान

पुरुषोत्तम डेरे
Wednesday, 18 November 2020

कारमधील दोघेही तत्काळ बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दोघेही मुंबईहून वाईला जात होते. या पेटलेल्या कारमुळे रस्त्याकडेचे झाडही पेटले गेले. त्यामुळे अपघात स्थळी आगीचे व धुराचे लोट निर्माण झाले.

कवठे (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाट उतरत असताना मुंबईकडून वाईकडे जाणारी कार क्र. MH06 AW 6755 ने अचानक पेट घेतला. कार पेट घेत असल्याचे लक्षात येताच कारमधील दोघेजण लगेचच बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. 
     
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून वाईला जाणारी कार खंबाटकी घाट उतरत एका वळणावर आली असता, कारने अचानकपणे पेट घेतला. कार पेटल्याचे लक्षात आल्यावर गाडी चालकाने ती कार रस्त्याच्या एका बाजूस उभी केली. कारमधील दोघेही तत्काळ बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दोघेही मुंबईहून वाईला जात होते. या पेटलेल्या कारमुळे रस्त्याकडेचे झाडही पेटले गेले. त्यामुळे अपघात स्थळी आगीचे व धुराचे लोट निर्माण झाले.

खून, दरोड्यातील सातजण तडीपार; उंब्रजात सातारच्या एसपींची मोठी कारवाई 

याबाबतची माहिती मिळताच वेळे ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसही पोहोचल्यावर घाटातील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. किसनवीर सहकारी साखर कारखाना व वाई नगरपालिकेचे अग्निशामक बंबाने ही आग विझविली. या आगीत गाडी संपूर्णतः जळून खाक होवून, लाखो रुपयांचे नुकसान झाले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Car Caught Fire In Khambhatki Ghat Satara News