गोमांस वाहतूक करणं पडलं महागात; भुईंजमध्ये टेंपो चालकावर गुन्हा

विलास साळुंखे
Thursday, 19 November 2020

पुणे- बंगळूर महामार्गावर वेळेच्या हद्दीत टेंपोतून (MH03 CP 6575) गोमांस वाहतूक होत असल्याचे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर टेंपो ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.

भुईंज (जि. सातारा) : पुणे- बंगळूर महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत गोमांस वाहतूक करणारा टेंपो जांब येथील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व भुईंजमधील युवकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी याप्रकरणी टेंपो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर वेळेच्या हद्दीत टेंपोतून (MH03 CP 6575) गोमांस वाहतूक होत असल्याचे शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर टेंपो ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. 

खंबाटकी घाटात मुंबईहून वाईला जाणा-या कारला आग; लाखोंचे नुकसान

टेंपोचालक अजमेर अजीज शेख (रा. अरळी कलकोट, जि. सोलापूर) याला अधिक चौकशी करून हे गोमांस टेंपोसह जप्त करण्यात आले. या प्रकरणी एक कार व आणखी एकावर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, निरीक्षक रत्नदीप भांडारे, हवालदार शिवाजी तोडरमल, हवालदार दत्तात्रय धायगुडे, हवालदार आनंदा भोसले करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Has Been Registered Against One In Bhuiyanj Satara News