विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी साताऱ्यातील तिघांवर गुन्हा

प्रवीण जाधव
Saturday, 21 November 2020

माहेरहून 10 लाख आणावेत, यासाठी तिघांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सातारा : माहेरहून दहा लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गोडोली येथील महालक्ष्मी रोड परिसरात राहणाऱ्या तीन जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

याबाबतची तक्रार प्रिया प्रसाद जगताप (वय 27, रा. महालक्ष्मी रोड, गोडोली, सध्या रा. कोरेगाव) यांनी नोंदविली आहे. प्रसाद सुभाष जगताप, बेबीनंदा सुभाष जगताप (रा. गोडोली), पौर्णिमा संतोष क्षीरसागर (रा. राजवाडा परिसर, सातारा) यांनी 2018 पासून वारंवार विविध कारणावरून छळ केल्याचे, तसेच लग्नाच्या वेळी आणि मुलीच्या बारशाच्या वेळी वडिलांनी दिलेले दहा तोळे सोने-चांदीचे दागिने काढून घेतल्याचे म्हटले आहे. माहेरहून 10 लाख आणावेत, यासाठी त्या तिघांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस हवालदार जगताप तपास करीत आहेत. 

सहा महिन्यांपूर्वीच पत्नी माहेरी; सासरी परत येत नसल्याने पतीची आत्महत्या

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Has Been Registered Against Three Persons In Satara