esakal | चोवीस तास देऊनही म्हणणे मांडलेच नाही, अखेर 12 आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

चोवीस तास देऊनही म्हणणे मांडलेच नाही, अखेर 12 आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा

संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मारुती सराटे तपास करत आहेत.

चोवीस तास देऊनही म्हणणे मांडलेच नाही, अखेर 12 आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : कोरोना काळात शारदा क्‍लिनिक एरम हॉस्पिटलमध्ये सेवेसाठी गैरहजर राहणाऱ्या 12 आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल कर्मचारी कुबेर महादेव भिलवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
साताऱ्यातील दरोडाप्रकरणी पुण्याचे चौघे ताब्यात 
 
पोलिसांची माहिती अशी : शहरातील शारदा क्‍लिनिक एरम हॉस्पिटल हे कोविड 19 म्हणून अधिगृहीत करण्यात आले आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात आली आहे. मात्र, तेथील दिग्विजय बबन यादव (रा. काले), रोहित महादेव खबाले (रा. विंग), संदीप जगन्नाथ नवाळे (रा. कालवडे), अनिकेत सदाशिव जगदाळे (रा. मलकापूर), रोहित संदीप हिरवे (रा. रेठरे बुद्रुक), सागर अर्जुन तेलकर (रा. मलकापूर), साहिल सदाशिव दिलबरे, (रा. मलकापूर), पूजा सदाशिव दलबरे (रा. तळबीड), करिश्‍मा अलमगीर (रा. मुंढे), तेजरी नारायण पाटील (रा. बाबरमाची), स्वाती संदीप पवार (रा. मलकापूर), रेखा नंदकुमार साळुंखे (रा. बैलबाजार रोड कऱ्हाड) हे कर्मचारी चार महिन्यांपासून विविध कारणे देऊन हॉस्पिटलमध्ये गैरहजर राहिले आहेत.

अवयवदानातून मिळाले चार रुग्णांना जीवनदान

साताऱ्यातील तहसील, प्रांत कार्यालय परिसरातील नो पार्किंगचा घाट रद्द करा

संबंधितांना महसूल विभागाने नोटीस बजावून चोवीस तासांत म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्याने कर्तव्यात कसूर करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत महसूल कर्मचारी भिलवडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मारुती सराटे तपास करत आहेत.

आमच्यात भेदभाव कशासाठी?, सैनिकांचा सरकारला सवाल

Edited By : Siddharth Latkar