esakal | साताऱ्यात राजे समर्थकांत तुफान 'राडा'; सहाजण गंभीर, 16 जणांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांत रात्री जोरदार धुमश्चक्री उडाली.

साताऱ्यात राजे समर्थकांत तुफान 'राडा'; सहाजण गंभीर, 16 जणांवर गुन्हा

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : साताऱ्यात नगरसेवकाच्या संपर्क कार्यालयासमोर वाहन लावल्याच्या कारणावरून खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinhraje Bhosale) यांच्या समर्थकांत काल रात्री धुमश्चक्री उडाली. यात नगरसेवक बाळासाहेब खंदारे व सनी भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांत झालेल्या या मारामारीत सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबाबत सातारा शहर पोलिसांनी (Satara City Police Station) तब्बल 16 जणांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुवव्यवस्था चोख राहावी, यासाठी बुधवारी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यासह शांतता कमिटीची बैठक येथील पोलीस करमणूक केंद्रात घेतली. या बैठकीत एसपींनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. या सूचना देऊन काही तास उलटत नाहीत, तोच सातारा शहरात दोन राजांच्या समर्थकांच्या गटात बुधवारी सायंकाळी मोठी धुमश्चक्री झालेली पहायला मिळाली.

हेही वाचा: पत्रकारांनी 'दहशतवादी' म्हणणं बंद करावं, अन्यथा..

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खासदार उदयनराजे भोसले समर्थक सनी भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लागवली होती. त्यातून या नगरसेवकांच्या समर्थकांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे संबंधित युवकाने त्याची गँग बोलावून तेथेच राडा करण्यास सुरुवात केली. या राड्यात तब्बल सहाजण गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची सातारा शहर पोलिसांनी गंभीररित्या दखल घेतली आहे. या हाणामारीत सहभागी असलेल्या 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

loading image
go to top