भाजप नगरसेविकेवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप नगरसेविकेवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

आपल्या प्रभागात डस्टबिनचे वाटप करून आचारसंहिता भंग केल्याचे कुंभार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

भाजप नगरसेविकेवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना प्रभागामध्ये डस्टबिनचे वाटप करून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका सिद्धी पवार यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहूपुरी पोलिस ठाण्यातील हवालदार धनंजय कुंभार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाली आहे. एक डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघात सातारा जिल्ह्याचाही समावेश आहे.

सज्जनगडावरील मालमत्ता संस्थानला द्या,समर्थ सेवा मंडळाने देणग्यांचा तपशील द्यावा; न्यायालयाचा आदेश

त्यामुळे जिल्ह्यातही दोन नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांवर काही बंधणे आली आहेत. असे असतानाही सिद्धी पवार यांनी आपल्या प्रभागात डस्टबिनचे वाटप करून आचारसंहिता भंग केल्याचे कुंभार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top