esakal | कोरोना चाचणीला नकार; एकावर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना चाचणीला नकार; एकावर गुन्हा दाखल

त्याच्या या कृत्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास व शेजारील लोकांना लागण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. डॉक्‍टर व महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांच्या आदेशाचे पालन केले नाही, म्हणून कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना चाचणीला नकार; एकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण (जि. सातारा) : कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व घरातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यासाठी गेलेल्या महसूल, डॉक्‍टर व पोलिस कर्मचारी यांच्या पथकाशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल जाधववाडी येथील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यांवरील छाप्यात साताऱ्यात चौघांवर गुन्हा 

याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की ता. १८पासून ता. २० या कालावधीत जाधववाडी (ता. फलटण) येथील बिरदेवनगरमध्ये विशाल दिलीप कदम याला व त्याच्या घरातील सात सदस्य अतिसंवेदनशील आहेत. त्यांची कोरोना चाचणी घेण्याकरिता वारंवार विशाल कदम यांच्यामार्फत बोलावले. परंतु, जाणीवपूर्वक चाचणी न करता हॉस्पिटलमध्ये आला नाही. तसेच महसूल, डॉक्‍टर व पोलिस विभागाचे कर्मचारी यांचे पथक घरातील व्यक्तींना घेण्याकरिता व क्वारंटाइन करण्यासाठी काल गुरुवारी (ता. २०) दुपारी तीन वाजता गेले असता विशाल कदम याने पथकासोबत वाद घातला. घराचा दरवाजा लावून घेतला व शासकीय कामात व्यत्यय आणला.

महिलांवरील अत्याचारातील संशयितांना जामीन नको - चित्रा वाघ - 

त्याच्या या कृत्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास व शेजारील लोकांना लागण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. डॉक्‍टर व महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांच्या आदेशाचे पालन केलेले नाही, म्हणून कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मंडलाधिकारी विलास जोशी यांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस नाईक गिरी करीत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top