टपाल खात्यातील पैशावर मलवडीतील दांपत्याचा डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टपाल खात्यातील पैशावर मलवडीतील दांपत्याचा डल्ला

या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करत आहेत.

टपाल खात्यातील पैशावर मलवडीतील दांपत्याचा डल्ला

दहिवडी (जि. सातारा) : टपाल खात्याच्या विविध योजनांमध्ये ग्राहकांनी भरण्यास दिलेले पैसे परस्पर लंपास करून पती- पत्नीने टपाल खात्यात आठ लाखांचा अपहार केल्याची घटना मलवडी (ता. माण) येथे घडली आहे. याबाबतची तक्रार वडूज पोस्ट उपविभागाचे निरीक्षक धनेश यादव यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात केली आहे.

याबाबतची माहिती अशी, सुग्रीव रमेश जाधव व त्यांची पत्नी सारिका सुभाष माने हे दोघे मलवडी येथे राहतात. सुग्रीव जाधव हा मलवडी येथील टपाल कार्यालयात कार्यरत आहे. सुग्रीव व सारिका यांनी संगनमत करून 10 जानेवारी 2017 ते 21 सप्टेंबर 2020 या दरम्यान मलवडी शाखेत अपहार केला आहे. या दोघांनी सुकन्या समृद्धी योजना, मुदत ठेव योजना, बचत ठेव योजना, ग्रामीण डाक जीवन विमा योजना या योजनात खातेदारांनी ठेवण्यास दिलेली रक्कम खातेदारांच्या पुस्तकावर नोंद केली. मात्र, रक्कम खात्यात भरलीच नाही, तसेच बनावट मुदत ठेव खाती तयार केली. याप्रकारे आठ लाख 97,812 रुपयांचा अपहार केला. त्यापैकी सुकन्या समृद्धी योजनेतील 60 हजार रुपये व बचत ठेव योजनेतील दहा हजार रुपये दहिवडी डाकघर येथे जमा केले. उर्वरित आठ लाख 27,812 रुपये व त्यावरील व्याज असा त्यांनी अपहार केला आहे.

'एल्गार' नंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे पैसे 

याबाबतची तक्रार वडूज पोस्ट उपविभागाचे निरीक्षक धनेश यादव यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top