काेराेना याेध्यांवर हल्ला ; महाबळेश्वरात 125 जणांवर गुन्हा दाखल

अभिजीत खूरासणे
शुक्रवार, 31 जुलै 2020

रांजणवाडीच्या घटनेच्या पडसाद आज (शुक्रवार) पालिकेच्या आवारात दिसून आले. महाबळेश्वरातील पालिका कर्मचारी यांनी काम बंद आंदाेलनाचा पवित्रा घेतला. या घटनेची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गंभीर दखल घेतल्याचे नमूद केले.

महाबळेश्वर (जि.सातारा) :   रांजणवाडी येथे कोरोनाबाधित नेण्यासाठी आलेल्या महाबळेश्वर पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुरुवारी (ता.30) दगडाने हल्ला केल्यामुळे चार जणांसह १०० ते १२५ अनाेळखी व्यक्तींवर आज (शुक्रवार) गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच येथे पोलिसांची फौज मागविण्यात आली व शहरातून संचलन करण्यात आले.
ताे पाणीपुरी विकून झाला यशस्वी 

महाबळेश्वर येथील रांजणवाडीमधील वस्तीवर गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी रात्री (ता.30) येथील सात जणांना बाधा झाल्याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. एवढे दिवस महाबळेश्वर हद्दीत एकही रुग्ण नसल्यामुळे महाबळेश्वरकर सुरक्षित होते. परंतु सात जणांना बाधा झाल्याची माहिती पसरताच संपुर्ण शहर हादरले. या रुग्णांना उपचारासाठी आणि अधिक तपासणीसाठी मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ. शहा व पालिकेचे अधिकारी व कर्मचारी दोन रुग्णवाहिकांसह रांजणवाडी येथे दाखल झाले होते. यावेळी रांजणवाडीमधील रहिवाशांनी रुग्ण नेऊन देणार नाही अशी भुमिका घेतली. त्यांचा उपचार येथेच करावा असा आग्रह धरुन गोंधळ घातला.

या शहरात साकारणार शांतीचे आकर्षक प्रतिक, कोणत्या ते वाचा..?

यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अचानक काहींनी पालिकेच्या पथकावर दगड मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकाराने पालिका कर्मचारी घाबरले. या घटनेत पालिकेच्या वाहनाचे नुकसान झाले. वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्यासह पोलिस निरीक्षक बि.ए.कोंडूभैरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

या घटनेची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गंभीर दखल घेतल्याचे नमूद केले. ते म्हणाले गुरुवारी (ता.30) रात्रीच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती. या प्रकरणी काेणाचीही गय केली जाणार नाही. जे दाेषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल हाेतील. काेराेनाच्या काळात कार्यरत असलेले विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, सेवक यांना काेणी त्रास दिला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार.

सातारा जिल्ह्यातील बाजारपेठ उद्यापासून खूली, दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरावे

एरवी थंड असलेले महाबळेश्वर अचानक तापले, नेमकं काय झाले रात्री वाचा सविस्तर

आज (शुक्रवार) सकाळी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नाजनीन रौफ डांगे, नईम मुजावर, वाहीद उस्मान मुजावर, अझर बडाणे यांच्यासह १०० ते १२५ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती महाबळेश्वर पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Four Citizens For Pelting Stones On Ambulance In Mahableshwar