या कारवाईमुळे सातारा जिल्हा प्रशासनासह कऱ्हाड नगरपालिकेत (Karad Municipal Corporation) खळबळ उडाली आहे.
कऱ्हाड : कऱ्हाड (जि. सातारा) शहरातील बांधकाम परवान्यासाठी १० लाखांच्या लाचेची मागणी करून पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना सहाय्यक नगररचनाकारासह दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (Satara Anti-Corruption Department) काल रात्री (सोमवारी) सापळा रचून ताब्यात घेतलं. याप्रकरणी तत्कालिन मुख्याधिकारी शंकर खंदारेंसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे उपाधिक्षक राजेश वाघमारे यांनी दिली.