
साेशल मिडियाच्या माध्यमातून सातारा शहरातील युवतीची आणि महिलेची फसवणुक करणा-या घटना घडल्याने नागरिकांनी साेशल मिडियाचा सतर्क राहून वापर करावा असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.
सातारा : इन्स्टाग्राम ऍपवरून झालेल्या मैत्रीनंतर कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत तालुक्यातील एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश विश्वकर्मा (रा. सरिया, झारखंड) असे त्याचे नाव आहे.
डिसेंबर 2019 पासून वेळोवेळी त्याने सातारा, पुणे येथे बलात्कार केला, तसेच झारखंड येथे नेऊन मारहाण केली व गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेतली, असे संबंधित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान शहर परिसरातील एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी, तसेच दागिने व दुचाकी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मुकेश विश्वकर्मा याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
घरातील परिस्थितीचा फायदा घेत त्याने विश्वास संपादन केला, तसेच लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर दागिने व दुचाकी घेऊन फसवणूक केल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करत आहेत.
सावधान! साता-यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने गंडा घालणारी टोळी सक्रिय
Edited By : Siddharth Latkar