
माढा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंहांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
MP Ranjitsingh Naik Nimbalkar : कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माढा मतदारसंघाचे (Madha Constituency) भाजपचे (BJP) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रणजितसिंह यांच्यासह तीन जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध दिगंबर आगवणे (Digambar Agawane) यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. खासदार रणजितसिंह यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून दिगंबर आगवणे यांची ओळख होती. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांची पत्नी जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय ठाकूर आणि लतिफ तांबोळी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा: मुख्यमंत्री बनविण्यासाठी माझ्याकडे मागितले 2500 कोटी; भाजप आमदाराचा दावा
लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कारखान्याची खोटी बिले बनविल्या प्रकरणी रणजितसिंहांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. खासदार निंबाळकरांनी आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं आगवणेंनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. त्यांच्याविरुद्ध फलटण पोलीस ठाण्यात (Phaltan Rural Police Station) भा.द.वि. 405, 406, 418, 420, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Case Registered Against Mp Ranjitsingh Naik Nimbalkar At Phaltan Rural Police Station
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..