esakal | विवाहितेला जबरदस्तीने पाजले विषारी औषध; पतीसह सासू, दिराविरुध्द गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

विवाहितेला मारहाण करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा प्रकार आज उघडकीस आला.

विवाहितेला जबरदस्तीने पाजले विषारी औषध; पतीसह सासू, दिराविरुध्द गुन्हा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : विवाहितेला मारहाण करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा प्रकार आज उघडकीस आला. तालुक्यातील कालेटेक येथे घटना घडली असून विवाहितेने पोलिसांना (Karad Police Station) तत्काळ याबाबत माहिती सांगितली. पोलीस पाटील (Police Patil) यांनी तत्काळ रूग्णवाहिका बोलावून विवाहितेला उपचारास हलविल्याने तीचे प्राण वाचले. हिना सरफराज शेख (वय २५ रा. कालेटेक) असे संबंधित विवाहितेचे नाव आहे. तीच्यावर खासगी रूग्णालयात (Private hospital) उपचार सुरू असून तीने दिलेल्या तक्रारीनुसार पती सरफराज, सासू रूक्साना व दीर नवाज शेख यांच्यावर तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. (Case Registered Against Three Persons At Karad Police Station For Harassing Hina Sheikh Satara Crime News)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : हिनाचा सरफराज यांच्याशी २०१५ मध्ये विवाह झाला. मात्र, वर्षापूर्वी त्यांच्यात भांडण झाले. त्यामुळे हिना तीच्या मुलीसह माहेरी गेल्या. काल त्या परतल्या होत्या. त्यांना पती सरफराज यांनी फोन केला. त्यामुळे हिना या भावासह कालेटेक येथे परवा आल्या. त्याच रात्री पुन्हा सासरच्या लोकांशी हिनाचा वाद झाला. सासू व पतीने तिला मारहाण केली.

हेही वाचा: कोरोना नियमांचे उल्लंघन; संभाजी भिडेंसह ८० जणांवर गुन्हा

दरम्यान, त्यांनी हिनाला पकडून नाक दाबत तिला विषारी औषध पाजले, असे हिना यांनी दिलेल्या फियादीत म्हटले आहे. विष पाजून त्यांना हिनाला घरा बाहेर काढले. त्याचवेळी हिनाने पोलिसांना फोन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांना प्रकार सांगितला. ते थेट शेख यांच्या घराकडे आले. तद्नंतर ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने रूग्णवाहिका बोलवून त्यांनी हिनाला खासगी रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हिना शेखने दिलेल्या फिर्यादीवरून सासू, पतीसह दिरावर गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार एस. ए. डांगे तपास करत आहेत.

Case Registered Against Three Persons At Karad Police Station For Harassing Hina Sheikh Satara Crime News

loading image