महिलेवर बलात्कारप्रकरणी साताऱ्यात दोघांवर गुन्हा 

प्रवीण जाधव
Thursday, 13 August 2020

या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख हे करत आहेत. 

सातारा : शहर परिसरातील एका महिलेचा त्रास दूर करण्याच्या बहाण्याने 2007 पासून वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी दोघांवर बलात्कार व अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फादर प्रमोद सदानंद लोंढे (रा. करंजे) व ऍड. मंगेश चंद्रकांत पाटील (रा. दौलतनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सातारा जिल्ह्यात मृत्युसत्र सुरुच 

याबाबत संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 2007 पासून संशयितांनी त्रास दूर करण्याच्या बहाण्याने, तसेच पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत व फोटो सर्वांना दाखविण्याची धमकी देत असे.

Video : एसटी, रेल्वेसाठी वंचितने वाजवली डफली, लॉकडाउन उठवाची घोषणाबाजी

साताऱ्यातील सिव्हिलला मिळाला कारभारी, डॉ. गडीकरांचे काय झाले वाचा

याबराेबरच शिवीगाळ व मारहाण करून सातारा व सांगली येथील ठिकठिकाणी बलात्कार केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख तपास करत आहेत. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Two Citizens Of Satara