esakal | वादातून हातावर चाकू मारल्‍याप्रकरणी सैदापुरात महिलेवर गुन्‍हा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime

घरात आल्‍यानंतर वृषाली यांनी घरगुती कारणावरुन वाद घालण्‍यास सुरुवात केली.

वादातून हातावर चाकू मारल्‍याप्रकरणी सैदापुरात महिलेवर गुन्‍हा

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : किरकोळ घरगुती वादातून हातावर चाकू मारल्‍याप्रकरणी सैदापूर (ता. सातारा) येथील वृषाली अनुप लकडे यांच्‍यावर सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात (Satara Taluka Police Station) गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. सैदापूर (Saidapur) येथे अनिता अविनाश लकडे या कुटुंबीयांसमवेत राहण्‍यास आहेत. काल सकाळी अनिता या पती अविनाश, मुलगा अजिंक्‍य यांच्‍यासमवेत घरात होत्‍या. यावेळी त्‍याठिकाणी सून वृषाली व मुलगा अनुप आले. घरात आल्‍यानंतर वृषाली यांनी घरगुती कारणावरुन वाद घालण्‍यास सुरुवात केली.

वाद घालत असतानाच वृषाली या अनिता यांच्‍या अंगावर धावून आल्‍या. यावेळी अनुप हे मध्‍ये पडले. यामुळे चिडलेल्‍या वृषाली यांनी घरातील स्‍वयंपाक घरात असणारी सुरी आणत अनुप यांच्‍या दोन्‍ही हातांवर जखमा केल्‍या. यात अनुप हे किरकोळ जखमी झाले आहेत. याची तक्रार अनिता लकडे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून वृषाली लकडे यांच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

हेही वाचा: 'अन्यायग्रस्त महिलांनी पोलिसांत तक्रार द्या, नाव गुपित ठेवलं जाईल'

मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्‍हा

सातारा : किरकोळ कारणावरुन येथील बाँबे रेस्‍टॉरंट (Bombay Restaurant) परिसरात झालेल्‍या मारामारीप्रकरणी काल दाखल झालेल्‍या परस्‍पर विरोधी तक्रारीनुसार चार जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. बाँबे रेस्‍टॉरंट पूल परिसरात नरेश धना भाटी हे राहण्‍यास असून त्‍यांचा मूर्ती बनविण्‍याचा व्‍यवसाय आहे. त्‍यांच्‍यात आणि अमित भाटी यांच्‍यात मारामारी झाली होती. याप्रकरणी अमित भाटी यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवली होती. याच अनुषंगाने नरेश भाटी यांनी देखील परस्‍परविरोधी तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली आहे. यानुसार अमित भाटी, कांझी भाटी, पिता शंकर सोलंकी, शंकर सोलंकी (रा. बाँबे रेस्‍टॉरंट) यांच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. या तक्रारीत अमित भाटी यांनी चौघा संशयितांनी कुटुंबातील महिलांना शिविगाळ, दमदाटी करुन चाकुने मारहाण केल्‍याचेही नमूद केले आहे. याचा तपास सहाय्‍यक पोलिस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.

हेही वाचा: बाल गणेशाने इथेच मारला सिंदुरासुरास

loading image
go to top