esakal | 'अन्यायग्रस्त महिलांनी पोलिसांत तक्रार द्या, नाव गुपित ठेवलं जाईल'
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai

सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही महिला व मुलींची छेडछाड होणार नाही, यासाठी बीट मार्शल यांचे पेट्रोलिंग वाढवण्यात यावे.

'अन्यायग्रस्त महिलांनी पोलिसांत तक्रार द्या, नाव गुपित ठेवलं जाईल'

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यात महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या प्रक्रियेला सव्वादोन महिने झाले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. जिल्ह्यातील कुठल्याही महिलेवर अन्याय, अत्याचार झाल्यास त्यांनी तो सहन न करता नजीकच्या पोलिस ठाण्यात (Police Station) तक्रार नोंद करावी. तक्रार देणाऱ्या महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी केले.

महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा (Women Safety Project) आढावा गृहराज्यमंत्री देसाई यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतला. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते. महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाल्यापासून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झाले आहे, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, ‘‘नुकताच शासनाने लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली आहे. बाजारपेठा, मॉल्स नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. या ठिकाणी आता गर्दी दिसत आहे.

हेही वाचा: साताऱ्यात सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; वादग्रस्‍त चार विषय स्‍थगित

या सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही महिला व मुलींची छेडछाड होणार नाही, यासाठी बीट मार्शल यांचे पेट्रोलिंग वाढवण्यात यावे. साध्या ड्रेसमध्ये पोलिस तैनात करावेत. कोणीही संशयित आढळल्यास त्याला ताब्यात घेऊन चौकशी करावी. त्याचे वर्तन योग्य नसल्याचे आढळल्‍यास त्याच्यावर तत्काळ कारवाई करा.’’

हेही वाचा: बाल गणेशाने इथेच मारला सिंदुरासुरास

loading image
go to top