
पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे अधिक तपास करत आहेत.
वाई (जि. सातारा) : येथील वरखडवाडीतील (ता. वाई) एका कुटुंबातील सदस्यांनी पार्टीला मतदान न केल्याने घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर वाई पोलिस ठाण्यात मारहाणीचा व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. वरखडवाडीत तणाव निर्माण झाला होता. मतमोजणी दिवशी सायंकाळी प्रकाश बबन रांजणे हे घरात सायंकाळी टीव्ही पाहात बसले होते.
त्याच वेळी वैभव बाजीराव साळुंखे, पंकज दामोदर पवार, प्रसाद सर्जेराव साळुंखे, विशाल आनंदराव फणसे यांनी घरात घुसून तू आमच्या पार्टीला का मतदान केले नाही, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत हातातील काठीने मारहाण केली. त्यात अश्विनी रांजणे, कृष्णा महादेव रांजणे, शिवाजी महादेव सपकाळ जखमी झाले.
या प्रकरणी प्रकाश रांजणे यांनी मारहाण करणाऱ्या चौघांवर तक्रार दाखल केल्यानंतर मंगळवारी (ता. 19) पहाटे पोलिसांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे अधिक तपास करत आहेत.
इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी
मंत्रालयातील निलंबित अव्वल सचिव खाताेय कोठडीची हवा
सातारा पालिका निवडणुक लढण्यासंदर्भात शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला
Edited By : Siddharth Latkar