तापोळ्यात दुर्मिळ कासव पाळल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल; महाबळेश्वर वन विभागाची कारवाई

वन्यप्राणी पाळल्याने हॉटेल मालक विजय शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Mahabaleshwar Forest Division
Mahabaleshwar Forest Divisionesakal
Updated on
Summary

भारतीय मऊ पाठीचे कासव ताब्यात घेतले असून महाबळेश्वर वन विभागाने ही कारवाई केली आहे.

महाबळेश्वर : तापोळा परिसरातील एका हॉटेलच्या फिश टँकमध्ये भारतीय मऊ पाठीचे कासव महाबळेश्वर वन विभागाने (Mahabaleshwar Forest Division) ताब्यात घेतले, तसेच हे दुर्मिळ कासव (Turtle) पाळल्याप्रकरणी एकावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. विजय बबन शिंदे (रा. हरचंदी, ता. महाबळेश्वर) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, की हरचंदी (मोरेवाडी) येथील तापोळा रस्त्यावर असलेल्या निलमोहर ॲग्रो रिसॉर्टमधील फिश टँकमध्ये भारतीय मऊ पाठीचे कासव वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील अनुसूची- एकमधील वन्यप्राणी पाळल्याने हॉटेल मालक विजय शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच भारतीय मऊ पाठीचे कासव ताब्यात घेतले.

Mahabaleshwar Forest Division
'या' सर्वात जुन्या धरणासाठी म्हैसूरच्या महाराजांनी राजेशाही दागिने ठेवले होते 'गहाण'; काय आहे धरणाची खासियत?

या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, वनपाल सहदेव भिसे, अर्चना शिंदे, वनरक्षक लहू राऊत, अभिनंदन सावंत, विलास वाघमारे, संदीप पाटोळे, रेश्मा कावळे, मीरा कुटे, श्रीनाथ गुळवे, विश्वंभर माळझळकर आदींचा समावेश होता. याप्रकरणी पुढील तपास गणेश महांगडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chandrashekhar Bawankule
513 mm rainfall in Mahabaleshwar today
Wilson Point Mahabaleshwar entry restrictions
Pratapgad search and rescue team mission
Marathi News Esakal
www.esakal.com