दुर्गामाता मंदिर उघडे ठेवणा-यांना पाेलिसांचा प्रसाद

गिरीश चव्हाण
Tuesday, 27 October 2020

या वेळी त्यांना मंदिरात गर्दी असल्याचे, तसेच आरती सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. याची माहिती त्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली.

सातारा : मनाई आदेश असतानाही येथील राजवाडा परिसरातील पंचपाळी दुर्गामाता मंदिर उघडे ठेवत त्याठिकाणी गर्दी जमविल्याप्रकरणी नऊ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व मंदिरे बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. 

हा आदेश असतानाही येथील राजवाडा येथे असणारे पंचपाळी दुर्गामाता मंदिर ता. 25 रोजी सकाळी सहा वाजता उघडे असल्याचे आढळले. त्याठिकाणी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोचले. या वेळी त्यांना मंदिरात गर्दी असल्याचे, तसेच आरती सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. याची माहिती त्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली.

युट्यूबवर व्हिडीओ पाहून थेट एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

वरिष्ठांच्या आदेशानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात धनंजय लक्ष्मण देशमुख (रा. रविवार पेठ, सातारा), चैतन्य जनार्दन पवार (रा. क्षेत्रमाहुली), विशाल दिलीप पवार (रा. भवानी पेठ), प्रेमचंद रुपचंद पालकर (रा. सदाशिव पेठ), हरिष विलास साळुंखे (रा. गुरुवार पेठ, सातारा), राजेंद्र रामचंद्र साळुंखे (रा. गुरुवार पेठ), शिवाजी वसंतराव भोसले (रा. रघुनाथपुरा करंजे), यलाप्पा नाना पाटील (रा. शेंडे कॉलनी, करंजे), शंतनू शरद देशमुख (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची फिर्याद पोलिस कर्मचारी शरद भोसले यांनी नोंदवली असून, तपास हवालदार काशीद हे करीत आहेत.

संपादन : संजय शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered On Panchapali Durga Matamandir Trustee Satara News