esakal | प्रा. एन. डी.- सरोजताई यांना शरद- प्रतिभा पुरस्कार जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. एन. डी.- सरोजताई यांना शरद- प्रतिभा पुरस्कार जाहीर

कोल्हापूर येथे मंगळवारी साडेचार वाजता राजश्री शाहू कॉलेजमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

प्रा. एन. डी.- सरोजताई यांना शरद- प्रतिभा पुरस्कार जाहीर

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : शरद- प्रतिभा या पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोजताई पाटील यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार येत्या मंगळवारी (ता. 29) कोल्हापूर येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. या वेळी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती मी कास्ट फ्री मूव्हमेंटचे अध्यक्ष, लेखक व दिग्दर्शक डॉ. प्रशांत गेडाम यांनी दिली.
 
महाराष्ट्राचा पुरोगामी विचार संस्कृती टिकवण्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे फार मोठे योगदान आहे. यासाठी त्यांना पत्नी प्रतिभाताई यांनी खंबीर साथ दिली. यामुळेच शरद पवार यांच्या जन्मदिनी त्यांच्या व प्रतिभाताईंच्या नावाने देण्यात येणारा पहिला शरद- प्रतिभा पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि सरोजताई यांना जाहीर करण्यात आला. स्मृतिचिन्ह व मानपत्र रोख रक्कम रुपये पन्नास हजार आणि सत्यशोधक पोषाख, शाल असे शरद- प्रतिभा पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापूर येथे मंगळवारी साडेचार वाजता राजश्री शाहू कॉलेजमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयतच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष माधवराव मोहिते हे भूषविणार आहेत.

शरद पवार नेहमीच आधुनिक शिक्षणासाठी आग्रही : डाॅ. अनिल पाटील
 
या वेळी रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य एम. बी. शेख, राष्ट्रवादीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राज्य समन्वयक संतोष साखरे, सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम साध्या पद्धतीने व निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार असल्याचे डॉ. प्रशांत गेडाम व सर्जेराव वाघमारे यांनी जाहीर केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image