वाढत्या रुग्ण संख्येत केंद्राच्या यादीत पुन्हा महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

वाढत्या रुग्ण संख्येत केंद्राच्या यादीत पुन्हा महाराष्ट्र

सातारा : सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या दाेन हजारांहून 1600 पर्यंत आली असली तरी गत दाेन आठवड्यात देशातील काेराेनाबाधित रुग्णांच्या (Covid 19 Patients) वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) सातारा (Satara) जिल्ह्याचा पुन्हा एकदा समावेश झालेला आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकराने जाहीर केली आहे. (government names 15 district increasing covid19 cases satara maharashtra news)

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रुग्ण संख्या वाढलेल्यांमध्ये कर्नाटक राज्यातील बंगळूरमधील अर्बन परिसर, म्हैसूर, तामिळनाडूतील चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, केरळमधील एर्नाकुलम, मालापूरम, महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. याबराेबरच पश्चिम बंगाल येथील पर्गानास (उत्तर) , कलकत्ता, राजस्थानमधील जयपूर, उत्तराखंडमधील डेहराडून, आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम, आेरिसामधील खोरधा येथे देखील माेठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढलेली आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी राज्याला देणार प्रतिमहिना 29 कोटी डोस; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सातारा जिल्ह्यात काेविड 19 बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत हाेती. मंगळवारी रुग्ण संख्या दाेन हजारांहून 1600 पर्यंत आली. त्यामुळे जिल्हावासियांना थाेडासा दिलासा मिळाला. दरम्यान केंद्र सरकाराने देशातील गेल्या दाेन आठवड्यातील रुग्ण संख्येची माहिती मंगळवारी (ता.11) जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांत पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचा समावेश झालेला आहे.

गेल्या दाेन आठवड्यात सातारा जिल्ह्यातील जाहीर केलेली रुग्ण संख्येमध्ये 19 ते 25 एप्रिल 11 हजार 568 , 26 एप्रिल ते दाेन मे 14 हजार 263 तसेच तीन ते नऊ मे कालावधीत 15 हजार 970 बाधित रुग्ण संख्या नाेंदविली गेलेली आहे. यापुर्वीच्या यादीत महाराष्ट्रातील सातारा आणि साेलापूर या दाेन जिल्ह्यांचा समावेश हाेता. नव्या यादीत साेलापूर जिल्ह्याचा समावेश नसल्याने तेथील रुग्ण संख्या कमी झाल्याचे दिलासादायक चित्र म्हणावे लागेल.

दरम्यान महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, नाशिक तसेच पालघर या जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत रुग्ण संख्या घटली आहे अशी माहिती देखील केंद्राने जाहीर केली आहे.

हेही वाचा: बसल्या बसल्या मालामाल होण्याची संधी! जाणून घ्या, कुठे, कसं?

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सातारा जिल्हा प्रशासनाने केवळ मेडीकल आणि आराेग्य विषयक सुविधांचे व्यवहार सुरु ठेवले आहेत. याव्यतरिक्त अत्यावश्यक सेवा घरपाेच देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील लाॅकडाउन 15 मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

Web Title: Central Government Names 15 District Increasing Covid19 Cases Satara Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top