पंतप्रधान मोदी राज्याला देणार प्रतिमहिना 29 कोटी डोस; देवेंद्र फडणवीस यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

पंतप्रधान मोदी राज्याला देणार प्रतिमहिना 29 कोटी डोस; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

म्हसवड (सातारा) : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे मायणी मेडिकल कॉलेजमधील कोविड हॉस्पिटल (Covid Hospital) तसेच दहिवडी, म्हसवड येथील तीनशेहून अधिक बेड्स आणि कोरोना उपचार केंद्रांच्या माध्यमातून निस्वार्थीपणे हजारो कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यासाठी त्यांनी खूप मोठी व्यवस्था उभी केली आहे. विरोधकांनी कितीही कोंडी केली तरी त्यांचे जनतेसाठी सकारात्मक काम सुरुच आहे. कोरोना काळातील त्यांच्या रुग्णसेवेला इश्वराचे पाठबळ आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (Devendra Fadnavis Testifies That Prime Minister Modi Will Give 29 Crore Doses To The State Every Month)

आमदार जयकुमार यांच्या प्रयत्नाने म्हसवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, माणगंगा शैक्षणिक संस्था संचलित येथील हरिभाऊ मंगल कार्यालयात मोफत जनसेवा कोविड उपचार केंद्राचा ऑनलाईन शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक मुकुंद आफळे, सहकार्यवाहक समीर सोनी, नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, घनश्याम, अभिजित केसकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, माण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, डॉ. सागर खाडे, डॉ. बाळकृष्ण शेटे, डॉ. अनिता खरात, माजी सरपंच रामचंद्र नरळे, नितीन दोशी, नगरसेवक अकिल काझी, लुनेश विरकर, डॉ. वसंत मासाळ व म्हसवड पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.

Maharastra Government (GR) : या आठवड्यातील राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय पहा एका क्लिकवर..

फडणवीस पुढे म्हणाले, येणारे सहा महिने राज्यासाठी महत्वाचे आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जनतेने लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) नेतृत्वाखाली भारतातील दोन आणि विदेशी काही लसींचे उत्पादन वाढवून महिन्याला 29 कोटी डोस प्रतिमहिना उपलब्ध होणार आहेत. केंद्राकडून राज्याला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शन आणि 1750 टन ऑक्सिजन दिला जात असल्याचीही त्यांनी सांगितले.

खासदार रणजितसिंह म्हणाले, "मायणी मेडिकल कॉलेज आज हजारो रुग्णांचा जीव वाचविण्यात मोलाची भूमिका निभावत आहे. मतदारसंघात रुग्णांवर उपचार करताना काही कमतरता जाणवली, तर शासकीय अधिकाऱ्यांना जयकुमार गोरेंचीच मदत होत आहे. आम्ही फलटण येथेही कोरोना उपचार केंद्र सुरु करत आहोत. या भागातील रस्त्यांसाठी बाराशे कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीमुळे मायणी मेडिकल कॉलेजात पाचशे बेडचे हॉस्पिटल आज सुरु आहे. आजपर्यंत आम्ही 3500 पेक्षा रुग्णांवर यशस्वी उपचार करुन कोरोना विरूध्दची लढाई समर्थपणे लढत आहे. म्हसवडच्या कोरोना उपचार केंद्रात शंभर बेड्सच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव मासाळ यांनी आभार मानले.

'नमाज'साठी 25 लोकांना परवानगी द्या; मुस्लीम समुदायाची सरकारकडे मागणी

औषधांसाठी 45 लाखांचा निधी

कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांसाठी 45 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. म्हसवड केंद्रात रुग्णांच्या जेवण, नाष्ट्याची सोय केली आहे. शासनाकडून मिळाली तर ठिक, नाहीतर रेमडेसिवीर इंजेक्शन मूळ किमतीत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आम्हाला खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची मोठी मदत होत असल्याचेही जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Devendra Fadnavis Testifies That Prime Minister Modi Will Give 29 Crore Doses To The State Every Month

Web Title: Devendra Fadnavis Testifies That Prime Minister Modi Will Give 29 Crore Doses To The State Every

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top