
कुडाळ : सातारा जिल्ह्यातील अनमोल ठेवा म्हणून म्हसवे (ता. जावळी) येथील महाकाय वटवृक्षांची ख्याती आहे. वटपौर्णिमेनिमित्त येथे महिलांसह अनेक निसर्गप्रेमी व पर्यटक भेट देतात. पाचवड- कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक असलेले वडाचे झाड देशातील सर्वांत जुने आणि विस्ताराने मोठे असे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला ‘वडाचे म्हसवे’ या नावाने ओळखले जाते.