
-प्रवीण जाधव
सातारा : चक्री जुगारातून जादा पैसे मिळविण्याच्या आमिषाला बळी पडून शहर परिसरातील अनेक युवकांनी लाखो रुपयांचा चुना लावून घेतला आहे. तरीही चक्रीची ठिकाणे सहज उपलब्ध होत असल्याने युवकांची त्याच्या मोहातून सुटका होत नाही. एवढेच नव्हे तर शाळा तसेच महाविद्यालयातील मुलेही याला बळी पडत असल्याने पालकांची डोकेदुखी वाढली आहे.