Satara Elections 2025 :सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट, गणांची रचना जाहीर
Electoral Reforms : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी गट व गणांची रचना लोकसंख्येच्या प्रमाणावर तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या रचनेवर हरकती मागवण्यात येणार आहेत.
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी गट, गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गट, गणांची रचना लोकसंख्येच्या प्रमाणात तयार करून त्यावर जिल्हाधिकारी हरकती मागवतील.