esakal | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन; परळीतील तिघांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन; परळीतील तिघांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात, तर दोघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. देगाव फाटा येथील श्रद्धा स्वीटस्‌ व दुग्धालय दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी सौरभ किरण ठोके (रा. विलासपूर, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Charges Were Filed Against Three Persons For Violating The Order Satara Crime News)

याबाबत हवालदार विशाल धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार कारळे तपास करीत आहेत. दरम्यान परळी येथे भाजीपाला विक्रीचे दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी अंकुश येदू गंगावणे (वय 51, रा. परळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच परळी येथेच विनामास्क फिरणाऱ्या अमोल सुरेश लोटेकर (वय 30, रा. कुस, ता. सातारा) या युवकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार दीपक पोळ यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार दीपक बर्गे तपास करत आहेत.

माजी आमदार प्रभाकर घार्गेंवर अटक वॉरंट; पडळ खूनप्रकरण भोवणार?

Charges Were Filed Against Three Persons For Violating The Order Satara Crime News

loading image