Satara News: करंजखोपमध्ये ‘चवणेश्वर’चा विजय; सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलचा १३-० ने धुव्वा
Chavaneshwar Triumphs in Karanjkhop: सर्वसाधारण गटात आठ पुरुष, सर्वसाधारण महिला राखीव गटात दोन व इतर मागास प्रवर्गातून तीन अशा एकूण १३ जागांसाठी श्री चवणेश्वर विकास आघाडी विरुद्ध शेतकरी विकास पॅनेलमध्ये दुरंगी चुरशीची लढत झाली. यामध्ये श्री चवणेश्वर विकास आघाडीने प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनेलचा १३-० असा पराभव केला.
"Chavaneshwar panel supporters celebrating after a 13-0 landslide victory in Karanjkhop cooperative society elections."Sakal
पिंपोडे बुद्रुक : करंजखोप (ता. कोरेगाव) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री चवणेश्वर विकास आघाडीने प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनेलचा १३-० असा धुव्वा उडवून सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले.