Chetna Sinha : माण देशीच्या कार्याची अमेरिकेकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chetna Sinha

Chetna Sinha : माण देशीच्या कार्याची अमेरिकेकडून दखल

म्हसवड : येथील माण देशी फाउंडेशन व महिला बँकेच्या संस्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी ग्रामीण महिलांना डिजिटल साक्षर करण्यास दिलेल्या योगदानाची दखल घेत अमेरिकेतील ‘क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह’ कार्यक्रमात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

‘क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह’ या न्यूयॉर्क येथील कार्यक्रमात पुरस्कार देऊन सत्कार केला. त्यावेळी सिन्हा यांनी भारतातील ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल साक्षर करण्याचा उपक्रम माण देशी फाउंडेशन व बँक राबवित आहे. त्याची दहा लाख महिलांपर्यंत व्याप्ती कशी होत गेली, याबरोबरच या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आयुष्य कसे बदलत गेले? याची माहिती उपस्थितांना दिली.

याबरोबरच माण देशी ग्रामीण तरुण मुलींना खेळाच्या माध्यमातून जागतिक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. देशात कोरोनाच्या साथीच्या संकटानंतर ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील त्रुटी निदर्शनास आल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी माण देशीने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही सेवाकार्य सुरू केले असल्याची माहिती दिली. याबरोबरच ‘जगात वाढतच चाललेल्या प्रदूषणाच्या समस्येवर ‘क्लिंटन ग्लोबल इनिशियएटिव्ह’ जे कार्य जागतिक स्तरावर कार्य करीत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमासाठी माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांच्यासह अमेरिकेतील सामाजिक सेवा संस्थांचे प्रतिनिधी, कृषी क्षेत्रातील तज्‍ज्ञ, प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Chetna Sinha Man Desi Foundation Award Bill Clinton Hillary Clinton Honored By

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..