Koyna Dam
Koyna Damesakal

कोयनेचे आपत्ती व्यवस्थापन सर्वोत्कृष्ट असेल; मुख्य अभियंता गुणालेंचा दावा

कोयनानगर (सातारा) : पावसाळा (Heavy Rain) सुरू झाला, की कोयना धरणाकडे (Koyna Dam) राज्याचे लक्ष लागते. यावर्षी १०२ टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे. त्यातच पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे मॉन्सून (Monsoon 2021) काळात कोयनेचे आपत्ती व्यवस्थापन (Koyna Disaster Management) प्रभावी होण्यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने कंबर कसली आहे. वडनेरे समितीने (Wadnere Committee) दिलेल्या मार्गदर्शक सूचना, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन या जोरावर कोयनेचे यावर्षीचे आपत्ती व्यवस्थापन सर्वोत्कृष्ट असेल, असा विश्वास कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले (Chief Engineer H. V. Gunale) यांनी व्यक्त केला. (Chief Engineer Gunale Claims That Koyna Disaster Management Is Excellent Satara Marathi News)

Summary

शतकातील सर्वात धुवांधार पाऊस २०१९ मध्ये झाला. पावसामुळे कोयना धरणातून नदीपात्रात सोडलेल्या उच्चांकी पाणीसाठ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला.

शतकातील सर्वात धुवांधार पाऊस २०१९ मध्ये झाला. पावसामुळे कोयना धरणातून नदीपात्रात सोडलेल्या उच्चांकी पाणीसाठ्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महापूर (Flood) आला. सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड ही मोठी शहरे पाण्यात होती. लाखो रुपयाची वित्तहानी झाली. कोयना धरण ते कऱ्हाडच्या प्रीतिसंगमापर्यंत नदीकाठावर असणाऱ्या गावाची पूरपातळी पूररेषा मुजल्या आहेत, तर काही ठिकाणी अस्पष्टपणे दिसत आहेत. कोयना नदीकाठची २३ गावे पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जीवन जगतात. पूररेषा व पूरपातळी आखण्याचे काम सुरू आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेचे असणाऱ्या कोयना धरणात सध्या २८ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र मुसळधार पावसाचे आगार म्हणून ओळखले जाते.

Koyna Dam
केळघर घाटातील फेसाळणा-या धबधब्यांची लुटा मजा
Koyna
Koyna

पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऑगस्ट महिन्यातच कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरते. यानंतर वाढत जाणारी धरणाची जलपातळी नियंत्रित करण्याचा प्रयोग सुरू होतो. यामुळे अनेक वेळा पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे वडनेरे समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोयना धरण परिचलन सूचीची अंमलबजावणी होणार आहे. कोयना धरणाचा सांडवा पातळीपर्यंत पाणीसाठा ७३ टीएमसी असून, त्या पातळीनंतर पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. सुधारित जलाशय परिचलनानुसार ३१ जुलैपर्यंत सांडवा पातळीपर्यंत म्हणजेच ७० टक्के पाणीसाठा, १५ ऑगस्टपर्यंत ८० टक्के पाणीसाठा करण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंतचे सर्व पूर ३१ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत आल्यामुळे या कालावधीत पाणीसाठा व पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन केले आहे, असे श्री. गुणाले यांनी सांगितले.

Chief Engineer Gunale Claims That Koyna Disaster Management Is Excellent Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com