केळघर घाटातील फेसाळणा-या धबधब्यांची लुटा मजा

Kelghar Waterfall
Kelghar Waterfall

केळघर (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश डाेंगराळ भागात धबधबे पाहण्यास मिळत आहेत. केळघर परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे केळघर घाटातील नयनरम्य धबधबे पर्यटकांचे आकर्षणबिंदू ठरत आहेत. मात्र, पर्यटनाला कोरोनामुळे काही बंधने असल्याने हे फेसाळणारे धबधबे पर्यटकांअभावी ओस पडलेले आहेत. (satara-kelghar-ghat-waterfall-mahableshwar-tourism)

महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची केळघर घाटातील धबधब्यांना पसंती असते. गेल्या वर्षीही कोरोनामुळे या धबधब्यांकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरू होत असतानाच हे धबधबे पाण्याने ओसंडून भरून वाहू लागल्याने लॉकडाउन उठल्यावर केळघर घाटातील हे नयनरम्य व आकर्षक धबधबे पुन्हा पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून जाणार आहेत.

Kelghar Waterfall
पावसाळ्यातील पर्यटनाचे आगार कोयनानगर

संततधार पावसामुळे हे धबधबे आता वाहू लागले आहेत. महाबळेश्वर तसेच कोकणात जाणारे पर्यटक केळघर घाटातून प्रवास करताना आवर्जून हे धबधबे पाहण्यासाठी थांबत होते. कोरोनामुळे पर्यटकांची गर्दी ओसरली आहे. दरम्यान उद्यापासून (साेमवार, ता. 21) महाबळेश्वरच्या पर्यटनास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या केळघर भागातून पुन्हा एकदा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढले अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Kelghar Waterfall
पर्यटकांना खुशखबर! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर, पाचगणी सोमवारपासून सुरु

दरम्यान परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे व विटा-महाबळेश्वर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असते. या भागात दरड कोसळल्याने दरडीचे दगड, चिखल, माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक केळघर घाटात ७ ते ८ ठिकाणी दरडीचे दगड रस्त्यावर आले आहेत. याबाबत बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता कृष्णात निकम म्हणाले परिसरात संततधार पाऊस सुरू असून दरडी हटविण्याचे काम झालेले आहे. नाल्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील. ग्रामस्थांसह पर्यटकांनी घाटातील रस्त्यावर वाहन हळू चाललावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Kelghar Waterfall
राज्यमंत्री विश्वजित कदम नाराज
Kelghar Waterfall
तलाठी भरती प्रक्रियेवर मराठा समाज नाराज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com