Child Marriage Horror in Karad: मुलीच्या लक्षात आल्यावर तिने माझे लग्नाचे वय नाही, म्हणत स्पष्ट नकार दिला असता तिच्या आई-वडिलांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुलीच्या परवानगीशिवाय तिचे लग्न करून तिला सासरी पाठवले.
"Tears couldn’t stop the ceremony — minor girl in Karad forced into marriage, threatened by her own parents."sakal
कऱ्हाड : तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावरून मुलीचे आई, वडील, पती, सासू, सासरे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.