esakal | इथं चांगला संचालक निवडून द्या : रामराजे नाईक-निंबाळकर
sakal

बोलून बातमी शोधा

रामराजे नाईक-निंबाळकर

इथं चांगला संचालक निवडून द्या : रामराजे नाईक-निंबाळकर

sakal_logo
By
रुपेश कदम ः सकाळ वृत्तसेवा

दहिवडी : सातारा जिल्हा बॅंक महाराष्ट्रातील एक नंबरची बँक आहे. अन तुमच्यातील एकाने अन आमच्यातील एकाने या बँकेची तक्रार ईडीत जावून केली अशी टिका विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता केली. त्यामुळे इथं चांगला संचालक निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

दहिवडी येथे श्री सिध्दनाथ पतसंस्थेच्या नूतनीकरण केलेल्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, अनिल देसाई, राजेंद्र हजारे, डॉ. सुरेश जाधव, मनोज पोळ, सहायक निबंधक विनय शिंदे, चेअरमन सुनिल पोळ, बाबासाहेब माने, बाळासाहेब सावंत, युवराज सुर्यवंशी, बाळासाहेब काळे, व्हाईस चेअरमन सुरेश इंगळे, निलिमा पोळ, किसन सावंत, तानाजी मगर, श्रीकांत जगदाळे, प्रशांत विरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: आर्यन खानला का झाली अटक?; जाणून घ्या...

रामराजे म्हणाले, कोणी कितीही गर्जना करुद्या जिल्हा बँकेत आपलंच पॅनेल येणार. या चांगल्या चाललेल्या बँकेला अडचणीत आणण्याचं काम काहीजण करत आहेत. पिक कर्ज देणाऱ्या बँकेला पिक कर्ज देण्यापासून काहीजण रोखत आहेत. अशा लोकांना बँकेत येवू देवू नका. आमदारकी येईल तेव्हा आपण बघू. बोलणारा मी एकटाच आहे .तुमच्या तालुक्यातील कोण बोलत नाही.यावेळी बोलताना रामराजे यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली.

loading image
go to top