..अखेर 'ग्राहक प्रबोधन'चे आश्वासनानंतर आंदोलन मागे; दहिवडीत 'महावितरण' विरोधात ठिय्या

..अखेर 'ग्राहक प्रबोधन'चे आश्वासनानंतर आंदोलन मागे; दहिवडीत 'महावितरण' विरोधात ठिय्या
Updated on: 

दहिवडी (जि. सातारा) : वीज ग्राहकांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या व ठेकेदारांवर मेहरबान असणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी महावितरण कार्यालयासमोर शुक्रवारी ग्राहक प्रबोधन समितीने ठिय्या आंदोलन केले. ग्राहकांच्या समस्यांचे निरसन करण्यात येईल, या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार गाढवांसह काढण्यात येणारा मोर्चा रद्द करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

महावितरणकडून भरमसाट बिले दिली गेली आहेत. कार्यालयात ग्राहक व शेतकऱ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येतात. शेतकरी, वीज ग्राहकांना अरेरावीची भाषा केली जाते. या सर्व बाबींविरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाबाबत लेखी पत्र देऊनही कोणीच वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणविरोधात घोषणाबाजी केली. वीजबिलांची होळीही केली. त्यानंतर काही वेळात वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी आले. 

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिल्याने आंदोलन मागे घेतले. या वेळी राजू मुळीक, शारदा भस्मे, एकनाथ वाघमोडे, वैभव जाधव, अक्षय मुळीक, शंभूराज जाधव, विक्रम जाधव, शंकर मुळीक, आशिष पवार उपस्थित होते. नवीन कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करून शेतकरी व वीज ग्राहकांचे प्रश्न मार्गी लावावेत अन्यथा महावितरण कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा समितीचे अध्यक्ष राजू मुळीक यांनी दिला आहे. ग्राहकांच्या वीजबिलाबाबतच्या तक्रारींचे ग्राहकानुसार तपासणी करून निरसन करण्यात येईल. तशा सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी हमी प्रभारी उपकार्यकारी अभियंता दत्ता शिंदे यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Udayanraje Bhosale Supports Dolby Operators
Sugarcane Agitation
Dhondewadi Ganesh Visarjan Dispute
Marathi News Esakal
www.esakal.com