पुरात अडकलेल्यांना कर्मचाऱ्यांकडून 'जीवदान'

सल्लाउद्दीन चोपदार
Sunday, 18 October 2020

अतिवृष्टीमुळे माण नदीच्या पात्राकडेस अडकलेल्या लोकांना खांद्यावर घेऊन पैलतीरावर पोचवण्याचे जोखमीचे काम कोरोना योद्धा टीमने केले. धाडसाने सुरक्षितपणे नागरिकांना बाहेर काढल्याबद्दल नागरिकांतून सर्वांचे कौतुक केले जात आहे.

म्हसवड (जि. सातारा) : येथील पालिका आपत्ती व्यवस्थापनासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे माण नदीच्या पात्राकडेस अडकलेल्या लोकांना खांद्यावर घेऊन पैलतीरावर पोचवण्याचे जोखमीचे काम सागर सरतापे व त्यांच्या समवेत असलेल्या कोरोना योद्धा टीमने केले. 

यामध्ये राजेंद्र सरतापे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, कर्मचारी प्रणेश मोरे, दादा सरतापे, गणेश चव्हाण, समीर सरतापे, राजेश चव्हाण, विजय लोखंडे, शरद वाघमारे, प्रवीण पिसे, निसार मुल्ला व त्यांचे सर्व सहकारी या मोहिमेत सक्रिय भाग घेतला. पूरजन्य स्थितीत नदीपलीकडे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी खांद्यावर उचलून पुराच्या पाण्याने भरून वाहत असलेल्या बंधाऱ्यावरून आणले. या सर्वांनी धाडसाने सुरक्षितपणे नागरिकांना बाहेर काढल्याबद्दल नागरिकांतून सर्वांचे कौतुक केले जात आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens Appreciated The Employees Of Mhaswad Municipal Corporation Satara News