esakal | अतिक्रमणावरुन ढेबेवाडीकर आक्रमक; ग्रामपंचायतीत वाचला समस्यांचा पाढा
sakal

बोलून बातमी शोधा

Dhebewadi Village

गटारे सफाई, कचऱ्याची विल्हेवाट, अतिक्रमणांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जावून गावकारभाऱ्यांना विविध प्रश्नांचा जाब विचारला.

अतिक्रमणावरुन ढेबेवाडीकर आक्रमक; ग्रामपंचायतीत वाचला समस्यांचा पाढा

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : गटारे सफाई, कचऱ्याची विल्हेवाट, अतिक्रमणांसह (Encroachment) विविध प्रश्नी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जावून गावकारभाऱ्यांना जाब विचारला आणि पावसाळ्यापूर्वी (Rain) सर्व समस्या सोडविण्याची विनंतीही त्यांना केली. (Citizens Demand The Government To Solve The Problems In Dhebewadi Village)

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित कडव, सोमनाथ पाटील, रविकांत रेडीज, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शंकर चौधरी, अधिकराव सागावकर, तमीज डांगे, सतीश आलेकर आदी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जावून सरपंच विजय विगावे यांच्याकडे ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले. त्या संदर्भात चर्चाही केली. ग्रामसेवक नेताजी पवार उपस्थित होते. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामामुळे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात निर्माण झालेली गैरसोय, नळ योजनेच्या पाइपलाइनसंदर्भातील अडचण, पाण्याच्या टाकीजवळच्या दूरसंचार कार्यालय व अंगणवाडीच्या इमारतीची धोकादायक स्थिती, ग्रामीण रुग्णालयासमोरील उघड्यावरील कचरा डेपो, तुंबलेली गटारे, डासांचा फैलाव, गावात ठिकठिकाणी लावलेले दगड-मातीचे ढिगारे आदी समस्यांकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम?

रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे, गटार व रस्त्यामध्ये लावलेल्या शोभेच्या झाडांचे योग्य ठिकाणी पुन्हा रोपण करावे, गावठाण व बाजारतळावरील अतिक्रमणे ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) शासकीय सोपस्कार करून हटवावीत, नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ व पुरेसे पाणी मिळण्यासाठी नळ योजनेतील त्रुटी व बिघाड दूर करावेत आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. याप्रश्नी तातडीने विचार करून शक्‍य ते प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मार्गी लावण्याची ग्वाही सरपंचांनी दिली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम?

Citizens Demand The Government To Solve The Problems In Dhebewadi Village