esakal | कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कुडाळात कडकडीत बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Public Curfew

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कुडाळात कडकडीत बंद

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : येथे आज अत्यावश्‍यक सेवा (मेडिकल आणि दवाखाने) वगळता सर्व दुकाने व भाजीपाला बंद ठेवण्यात आली. व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद देऊन कडकडीत बंदचे पालन केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथील आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार आजपासून आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याचे घोषित केले होते.

त्यानुसार संचारबंदीचे तंतोतंत पालन करण्यात येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने बाजारपेठेसह संपूर्ण गावात सामसूम दिसून आली. गेल्या दोन दिवसांत जावळीत 160 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले होते. कुडाळ हे तालुक्‍यातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे होते. त्यामुळे कोरोना संसर्गाची वाढती साखळी तोडण्यासाठी हा कठोर निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला होता.

पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फेरीवाल्यांना फटका; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा आरोप

या निर्णयाचे ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनीही काटेकोरपणे पालन करत बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवली. दिवसभरात दवाखान्याला जाणारे रुग्ण व शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय रस्त्यावर कोणीही फिरकले नाही. परिसरातील वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे बंद होती. जनता कर्फ्यूच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अत्यंत सतर्क असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आवश्‍यक ती गस्तही वाढविण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश कदम यांनी सांगितले.

Edited By : Balkrishna Madhale