esakal | सातारकरांनो! उद्या मिळणार तुम्हाला 'इथं' लस; जाणून घ्या कुठली लस, किती उपलब्ध?
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

सातारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम 16 जानेवारीपासून सुरु झाली आहे.

सातारकरांनो! उद्या मिळणार तुम्हाला 'इथं' लस; जाणून घ्या कुठली लस, किती उपलब्ध?

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : कोरोना बाधितांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत असताना जिल्ह्यात लसीकरण (Vaccination) मोहीमही गतीने सुरु आहे. काल रात्री जिल्ह्याला 14 हजार 900 कोविशिल्ड (Covishield) आणि दोन हजार कोव्हॅक्‍सिन (Covaxin) लशीचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात लशीचे वाटप केले असून, लसीकरण मोहीम पुन्हा पुर्ववत सुरु झाल्याचे लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के (Dr. Pramod Shirke) यांनी सांगितले. (Citizens Will Get Covishield And Covaxin Vaccine At Corona Center In Satara Tomorrow)

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम 16 जानेवारीपासून सुरु झाली. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात 45 वर्षापुढील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयासह आरोग्य केंद्रात मोठा प्रतिसाद मिळत होता. तसेच, दररोज 30 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याला लशीचा अल्प प्रमाणात साठा उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहीम बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले होते. मात्र, सध्यस्थितीत लशीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहीम पुर्ववत सुरु झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे सात लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, सर्वाधिक लसीकरण कोविशिल्ड लसीचे झाले आहे.

साताऱ्यात 27 मे'पासून 'या' केंद्रांवर होणार लसीकरण

45 वर्षापुढील नागरिकांसाठी लसीकरण

सिव्हिल हॉस्पिटल सातारा - 1

 • कोव्हिशिल्ड - 260

 • कोवॅक्सिन - 0

सिव्हिल हॉस्पिटल सातारा - 2

 • कोव्हिशिल्ड - 260

 • कोवॅक्सिन - 910

गोडोली

 • कोव्हिशिल्ड- 220

 • कोवॅक्सिन - 70

कस्तुरबा

 • कोव्हिशिल्ड - 220

 • कोवॅक्सिन - 70

चिंचनेर वंदन

 • कोव्हिशिल्ड - 260

 • कोवॅक्सिन - 20

कनेर

 • कोव्हिशिल्ड - 340

 • कोवॅक्सिन - 10

कुमठे

 • कोव्हिशिल्ड - 270

 • कोवॅक्सिन - 20

लिंब

 • कोव्हिशिल्ड - 290

 • कोवॅक्सिन - 10

नागठाणे

 • कोव्हिशिल्ड - 320

 • कोवॅक्सिन - 10

नांदगाव

 • कोव्हिशिल्ड - 230

 • कोवॅक्सिन - 0

परळी

 • कोव्हिशिल्ड - 190

 • कोवॅक्सिन - 30

ठोसेघर

 • कोव्हिशिल्ड - 190

 • कोवॅक्सिन - 0

महत्वाचे : लसीकरण मोहीम सकाळी दहा ते लस संपेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात लागोपाठ पाचव्या दिवशी 30 पेक्षा अधिक मृत्यू

Citizens Will Get Covishield And Covaxin Vaccine At Corona Center In Satara Tomorrow