esakal | धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात लागोपाठ पाचव्या दिवशी 30 पेक्षा अधिक मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना विरुध्दच्या लढाईत दुसऱ्या लाटेने जिल्ह्याला राज्यात क्रमांक एकवर नेवून ठेवले आहे.

धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात लागोपाठ पाचव्या दिवशी 30 पेक्षा अधिक मृत्यू

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना (Coronavirus) विरुध्दच्या लढाईत दुसऱ्या लाटेने जिल्ह्याला राज्यात क्रमांक एकवर नेवून ठेवले आहे. मात्र, वाढती बाधित वाढ, वाढता मृत्यूदर यावर प्रशासनाकडून (Government) फक्त लॉकडाउन (Lockdown) कडक केला एवढीच भूमिका घेतली जात आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2156 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित (Corona Patient) आले असून 40 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Coronavirus 40 Civilians Death In Satara District Today)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 94 (7139), कराड 227 (21309), खंडाळा 161 (9882), खटाव 324 (14625), कोरेगांव 181 (13483), माण 138 (10622), महाबळेश्वर 11 (3911), पाटण 81 (6324), फलटण 408 (22087), सातारा 437 (33886), वाई 82 (11233) व इतर 12 (989) असे आजअखेर एकूण 155490 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 2 (164), कराड 4 (612), खंडाळा 4 (130), खटाव 6 (394), कोरेगांव 3 (303), माण 2 (199), महाबळेश्वर 0(42), पाटण 4 (155), फलटण 2 (244), सातारा 9 (988), वाई 4 (298) व इतर 0 असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3529 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

होम आयसोलेशन रद्द; 'पीएचसी'त 100 बेडचा विलगीकरण कक्ष करा

Coronavirus 40 Civilians Death In Satara District Today