esakal | मल्हारपेठला लस घेण्यावरुन धक्काबुक्की; पोलिसांची घटनास्थळी धाव
sakal

बोलून बातमी शोधा

Malharpeth

मल्हारपेठला लस घेण्यावरुन धक्काबुक्की; पोलिसांची घटनास्थळी धाव

sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ (सातारा) : चार दिवसानंतर उपलब्ध झालेली लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात गर्दी झाली. लस घेण्यावरुन नागरीकांची धक्काबुक्की झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना शांत केले. त्यानंतर यापुढील लसीकरण (Corona Vaccine) शाळेत घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहेल शिकलगार यांनी सांगितले. (Civilians Fight While Getting Vaccinated At Malharpeth Satara News)

येथील लसीकरण (Vaccination) केंद्रावर लसीचा तुटवडा आहे. लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीपेक्षा तीनपट जास्त नागरीक रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे केंद्रावर मोठी गर्दी होवुन सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. चार-पाच दिवसानंतर मल्हारपेठ प्राथमिक केंद्रावर फक्त 100 लसचा साठा उपलब्ध झाला. सकाळी नऊपासुन 500 लोक रांगेत उभे होते. लस कमी प्रमाणात उपलब्ध आहे हे समजल्यावर नागरिकांत ती घेण्यावरुन वादावदी झाली. त्यादरम्यान धक्काबुक्कीही झाली.

'कलेक्टरांकडून सूचना' सोशल मीडियात Message व्हायरल; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

त्याची माहिती मिळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना पांगवले. त्यामुळे कोरोना टेस्टसाठी आलेल्यांना दिवसभर ताटकळावे लागले. त्याबाबत डॉ. शिकलगार म्हणाले, ""लस कमी प्रमाणात आल्याने धक्काबुक्की होणे ही बाब गंभीर आहे. 45 वर्षावरील नागरिकांचे डोस पूर्ण झाल्यानंतर 18 ते 45 पर्यंतच्या नागरिकांनी लसीकरणासाठी यावे. यापुढे लसीकरण शेजारील जिल्हा परिषद शाळेत करण्यात येईल.''

Civilians Fight While Getting Vaccinated At Malharpeth Satara News