'कलेक्टरांकडून सूचना' : सोशल मीडियात खोटा Message व्हायरल कराल, तर जेलची हवा खाल!

‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत.
Social Media
Social Media esakal

सातारा : ‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने साताऱ्यासह पुणे विभागातील काही जिल्ह्यात व्हॉटसॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदेशामध्ये दैनंदिन जीवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. अशी कोणतीही माहिती वा संदेश सातारा जिल्हा माहिती कार्यालयाकडून काढण्यात आला नाही. (The Message That Went Viral On Social Media Is False Collector Satara)

हा संदेश खोटा असून अशा बनावट मेसेजमधील आवाहनाला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे. अशा आपत्तीच्या काळात लोकांची दिशाभूल होईल असा कोणताही मजकूर जिल्हा माहिती कार्यालयाचे नाव टाकून खोडसाळपणे पसरविणाऱ्या संबंधितावर यापुढे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

कलेक्टरांच्या नावे व्हायरल झालेला काय होता मेसेज?

आपण सगळ्यांनीच आता अतिव दक्षता पाळायची आहे. त्याबाबत काही सूचना :

  1. शेजारी जाणे बंद

  2. गरम पाणी पिणे

  3. ब्रेड-पाव बेकरी सामान बंद

  4. बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेवू नये.

अजून सविस्तर

  • दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुऊन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुवा.

  • वृत्तपत्रे बंद करा, नाहीच जमले तर एका ट्रे'मध्ये चोवीस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.

  • पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरेसाठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.

  • जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना 'भरपगारी' सुट्टी देऊन टाका.

  • सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हातपाय धुवायला सांगा.

  • पुढील पंधरा-वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.

  • ज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बसने प्रवास करणे टाळावे.

  • ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे, त्यांनी घरून काम करावे.

  • फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुऊन घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुवून घ्या आणि मगच वापरा/खा.

  • झोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा.

  • पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे, बाहेर जाताना मास्क लावणे याची सगळ्यांनाच सवय लावणे.

  • चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.

  • बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग वेगळे ठेवावे.

  • कपड्यांना इस्त्री घरीच करा.

  • सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजार-यांशी गप्पा करणे वगैरे प्रकार टाळा.

  • दरवाजाची बेल कोणी येऊन गेले की पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझरने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या

  • स्वतःची काळजी घ्या बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या.. अशा आशयाचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

The Message That Went Viral On Social Media Is False Collector Satara

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com