

Satara Politics Heats Up Ahead of ZP Elections After Guardian Minister–NCP Meeting
Sakal
सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महायुतीत एकमत होत नसल्याने आज साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील व फलटणचे नेते, आमदार रामराजे, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात बंद दाराआड खलबते झाली. यामुळे भाजपला बाजूला ठेवत पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधत नवी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळू लागले आहेत.