Mahabaleshwar : CM शिंदे रमले शेतीत! हातात कुदळ अन् टॅक्टरचं स्टेअरिंग; शिंदेंना का आहे इतकी शेतीची आवड?

दरे (ता. महाबळेश्वर) येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी आले आहेत.
EknathShinde Strawberry Farming
EknathShinde Strawberry Farmingesakal
Summary

माणूस गावापासून कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या मातीबद्दल आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते.

सातारा : मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे व आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली.

दरे (ता. महाबळेश्वर) येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी आले आहेत. काल ते दिवसभर आपल्या शेतीत रमले होते. या वेळी त्यांच्या हस्ते औषधी हळद, स्ट्रॉबेरी (Strawberry Farming), आंबे, काजू, चिकू, बटाटा, सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.

EknathShinde Strawberry Farming
अंगावर गोळ्या झाडल्या तरी, OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण घेणार; वाघोलीत मनोज जरांगेंचा स्पष्ट इशारा

एकनाथ शिंदे म्हणाले, की शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना; पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गाव, शेती, गावाकडची माणसं यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. माणूस गावापासून कितीही दूर गेला, कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या मातीबद्दल आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते.

EknathShinde Strawberry Farming
राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना शरद पवार निवडणुकीत हिसका दाखवणार; रोहिणी खडसेंचा अजितदादा गटावर निशाणा

शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या पिकांचे उत्पादन घ्यावे, असे सांगून सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. कांदाटी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे खोरे निसर्गसंपन्न आहे. या खोऱ्यात वासोटा किल्ला, उत्तेश्वर मंदिर यासारखी विविध पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com