Eknath Shinde: आनंदाची बातमी! दुर्गम भागात नवीन एसटी बस दाखल होणार: एकनाथ शिंदे, महामंडळाचा घेतला आढावा
Satara News : दुर्गम भागात महाबळेश्वर आगार सेवा देत असून, आगाराच्या ताफ्यात असणाऱ्या बसची संख्या, आवश्यक बस, नवीन दाखल झालेल्या बस त्यांचे मार्ग याबद्दल माहिती आगार व्यवस्थापक जाधव यांनी दिली.
केळघर : महाबळेश्वर तालुक्यात एसटी महामंडळाकडून नवीन बसचा समावेश होणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील लोकांची अडचण दूर होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.