
Lockdown : आता विनाकारण घराबाहेर पडल्यास होणार पाचशे रुपयांचा दंड
सातारा : काही नागरिक मास्कचा (Mask) वापर न करता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तींकडून 500 रुपये दंड आकारण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी दिले आहेत. (Collector Shekhar Singh Fined The Citizens Five Hundred Rupees Satara News)
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरातून बाहेर पडताना व परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकार राहिल, असे कळविले असताना देखील अनेकजण मास्क न लावताच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे विनाकारण मास्कविना बाहेर पडणाऱ्यांकडून पाचशे रूपये दंड आकारण्यात यावा.
Corona काळात कामगारांचा जीव धोक्यात; नरेंद्र पाटलांची राज्यपालांकडे धाव
या दंडाची आकारणी पोलीस विभाग, ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, यांनी व शहरी भागात पोलिस विभाग, संबंधित नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असेही शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.
Collector Shekhar Singh Fined The Citizens Five Hundred Rupees Satara News
Web Title: Collector Shekhar Singh Fined The Citizens Five Hundred Rupees Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..