
Corona काळात कामगारांचा जीव धोक्यात; नरेंद्र पाटलांची राज्यपालांकडे धाव
ढेबेवाडी (सातारा) : माथाडी कामगार व त्यांच्याशी संलग्न अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वे व बसने प्रवास करण्यास परवानगी द्यावी. तसेच त्यांना विशेष विमा संरक्षण कवच लागू करावे, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिफारस करावी, अशी विनंती महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना राजभवनात भेटून केली. (Narendra Patil Meet On Governor Bhagatsingh Koshyari In Mumbai Satara News)
नरेंद्र पाटील यांच्यासह युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांचा शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, "गेल्या वर्षांपासून लॉकडाउनच्या (Lockdown) काळात माथाडी कामगार व अन्य घटक जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची तसेच खते, खाद्यमालाची चढ-उताराची कामे करीत आहेत.
वाढत्या रुग्ण संख्येत केंद्राच्या यादीत पुन्हा महाराष्ट्र
त्यांच्या न्याय प्रश्नांची अनेक निवेदने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधिताना सादर केली. लाक्षणिक संप केला, परंतु दखल घेतली गेली नाही म्हणून राज्यपालांना भेटून निवेदन सादर केले आहे.'' एका बाजूला जीवनावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची भूमिका घ्यायची आणि दुसरीकडे त्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्यांना संरक्षण देण्यास टाळाटाळ करायची हे धोरण कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Narendra Patil Meet On Governor Bhagatsingh Koshyari In Mumbai Satara News
Web Title: Narendra Patil Meet On Governor Bhagatsingh Koshyari In Mumbai Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..