सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : पहा काय सुरु राहणार, काय बंद!

उमेश बांबरे
Thursday, 15 October 2020

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता दिली जात आहे. आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आणखी शिथिलता दिली आहे. ही शिथिलता 31 ऑक्‍टोबरपर्यंत लागू राहणार आहे. यामध्ये सर्व दुकाने व मार्केट सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळेत सुरू राहतील, असे त्यांनी जाहीर केले आहे.

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमध्ये आज (ता. १५) जिल्हाधिकऱ्यांनी आणखी शिथिलता दिली आहे. यामध्ये सर्व दुकानांची वेळ वाढवून सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी केली असून सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित सर्व ठिकाणचे आठवडे बाजार (जनावरांसह) सुरू केले आहेत. तसेच बागा, उद्याने व करमणुकीच्या उद्देशाने केलेल्या सार्वजनिक मोकळ्या जागा सुरू राहणार आहेत. 

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता दिली जात आहे. आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आणखी शिथिलता दिली आहे. ही शिथिलता 31 ऑक्‍टोबरपर्यंत लागू राहणार आहे. यामध्ये सर्व दुकाने व मार्केट सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळेत सुरू राहतील. मेडिकल व औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार आहेत, तसेच 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ व मेळाव्यांनाही परवानगी दिली आहे, तर अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थित सामाजिक अंतराची अट पाळून परवानगी असेल, असेही जाहीर केले आहे. 

साता-याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाडले तहसीलदारांना आदेश

हे राहणार सुरू 

वृत्तपत्र छपाई व वाटप, केस कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, महा ई-सेवा केंद्र व सेतू केंद्र, सर्वउद्योग, इंधन पंप वैद्यकीय व्यवसाय, हॉटेल्स, रेस्टारंट व बार्स 50 टक्के क्षमतेने, ऑक्‍सिजन वाहतूक करणारी वाहने, खासगी व सरकारी ग्रंथालये, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा, रेल्वे वाहतूक 

हे राहणार बंद 

शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस, चित्रपट गृहे, जलतरण तलाव, थिएटर, सभागृहे, सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यकम व परिषदा, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, पान, दारू, इतर व्यसने, सर्व धार्मिक स्थळे 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Shekhar Singh Has Issued A New Order Satara News