काय बाई सांगू, कसं गं सांगू.. मलाच माझी वाटे लाज!

सिद्धार्थ लाटकर
Friday, 12 February 2021

संबंधित युवती या अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता चांगल्या वर्तवणुकीचे प्रॉमिस घेऊन घरी पाठविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सातारा : येथील एका महाविद्यालयाच्या समोर गुरुवारी युवतींच्या दोन गटात मारामारीचा प्रकार घडला. हा प्रकार काही विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये चित्रबद्ध केला. अवघ्या काही मिनीटांत संबंधित मारामारीची घटना सोशल मिडीयातून सर्वत्र घुमली. लाथा, बुक्‍यांनी एकमेकांना चोप देणा-या या युवतींना सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी पालकांसमक्ष योग्य ती समज दिली. दरम्यान सध्या सुरु असलेल्या 'व्हॅलेंटाईन वी' क (Valentine Week) मध्ये प्राॅमिस डे (Promise Day) दिवशी घडलेला प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे. 

साता-यातील एका महाविद्यालयासमोर युवतींमध्ये मारामारी झाली. ही मारामारी एका चित्रपटातील मारामारीच्या दृष्याला ही मागे टाकेल अशी होती. त्यामुळे अनेकांनी आपल्या मोबाईलवर आलेला व्हिडिओ दूस-याला पाठविण्यास प्रारंभ केला. या व्हिडिओत एका युवतीला दूसरी युवती जमीनीवर पाडून लाथा घालत घालताना दिस आहे. हा प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्या काही विदयार्थ्यींनीनी पळ काढला. हा सारा प्रकार पाहून नागरिकांनी देखील आपल्या डोक्‍यावर हात मारुन घेतला.
 
पोलिसांना या प्रकाराची माहिती समजताच महिला पोलिस अधिका-यांनी संबंधित युवतींना बोलावून घेतले. मारामारी करणा-या युवतींना आपली चूक कळाली होती मात्र वळाली नव्हती असे चित्र डीवायएसपी कार्यालयात थोडा वेळ पाहण्यास मिळाले. संबंधित कार्यालयात गर्दी वाढू लागताच युवती ताेंड लपवू लागल्या. त्यामुळे त्यांची चूक त्यांना समजल्याचे उपस्थितांना जाणवले. अखेर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी युवतींना पोलिसी खाक्‍याऐवजी प्रेमळ शब्दांत सुनावले. त्यावेळी मारामारी करणा-या युवतींनी पुन्हा असे घडणार नाही असे वचन दलाल मॅडम यांना दिले. दरम्यान युवतींमध्ये मारामारी झाल्याचा व्हिडिओ अनेकांनी एकमेकांना पाठविल्याने संबंधित प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. संबंधित युवती या अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता चांगल्या वर्तवणुकीचे प्रॉमिस घेऊन घरी पाठविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सोलो ट्रिपला जाताय.. मग, या खास गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

शिक्षणमंत्र्यांचं सर्व काही ऐकलं! आम्हांला काहीच नाही मिळालं; शैक्षणिक संस्थांची नाराजी 

खेळाडूंसाठी Good News : भारतीय नौदलात नाविकांची हाेणार भरती; जाणून घ्या कधी पर्यत करायचा अर्ज

'शिवेंद्रसिंहराजे कधीही कुणाच्या नादाला लागत नाहीत, लागलेच तर त्याचा नाद संपवल्याशिवाय गप्प बसत नाहीत'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: College Girls Fighting Video Viral On Promise Day Anchal Dalal Satara Trending News