esakal | जीवन प्राधिकरणाची रीडिंग न घेताच बिले; खासदार, आमदार तक्रारींची घेणार दखल?
sakal

बोलून बातमी शोधा

Water Bill

जीवन प्राधिकरणाची रीडिंग न घेताच बिले; खासदार, आमदार तक्रारींची घेणार दखल?

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : पाणी वापराची नोंद न घेता शाहूपुरीतील ग्राहकांना जीवन प्राधिकरणाच्या (Life Authority) वतीने बिले (Water Bill) देण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, याबाबतच्या तक्रारी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीकडून जीवन प्राधिकरणाच्या सातारा कार्यालयाकडे केल्या आहेत. दाखल तक्रारींची दखल प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी घेतात का, पुन्हा ठेकेदाराची पाठराखण करतात, याकडे शाहूपुरीकरांचे (Shahupuri Citizens) लक्ष लागून राहिले आहे. (Complaint Of Shahupuri Citizens On Life Authority Over Water Bill Satara News)

जीवन प्राधिकरणाच्या वतीने शाहूपुरीसह इतर उपनगरांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या बदल्यात जोडलेल्या मीटरच्या नोंदी घेत संबंधित ग्राहकास पाणीवापराचे बिल प्राधिकरणाकडून देण्यात येते. यासाठी परजिल्ह्यातील ठेकेदाराची नियुक्‍ती प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आली आहे. यापूर्वीच्या ठेकेदारास कात्रजचा घाट दाखवत प्राधिकरणाचे पाणी पिलेल्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच हा नवा ठेकेदार आणत त्याचे लाड पुरवल्याची चर्चा प्राधिकरणाच्या आवारात सुरू असते. नव्याने नेमलेल्या ठेकेदाराच्या विरोधात यापूर्वी अनेक तक्रारी नोंदल्या आहेत. मात्र, त्या तक्रारींचा कागदोपत्री निपटारा करण्यात प्रधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी धन्यता मानत आहेत.

हेही वाचा: साता-यात संततधार सुरुच; तापाेळ्यासह महाबळेश्वरात सर्वाधिक पाऊस

अलीकडच्या काळात शाहूपुरीतील अनेकांना पाणीवापराची बिले वाटण्यात आली आहेत. ग्राहक घरात असतानाही मीटर लॉक असा शेरा मारत तयार केलेल्या बिलांचाच त्यात जास्त भरणा आहे. ही बिले आणि त्यावरील आकडे पाहून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याबाबतच्या तक्रारी त्यांनी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीकडे केल्या. या तक्रारींची पडताळणी केली असता, ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले दिल्याचे समोर आले. यानुसार त्याची तक्रार भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव व इतरांनी प्राधिकरणाकडे केली आहे. या तक्रारींवर प्राधिकरण काय निर्णय घेते, याकडे शाहूपुरीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

खासदार, आमदारांनी लक्ष घालावे

प्राधिकरणात ठेकेदार राज असून, त्या ठिकाणचा कारभारही त्यांच्याच हुकूमानुसार सुरू असल्याचे बोलले जात आहे. अडचणीतील कामांची बिले काढण्यासाठी हे ठेकेदार खासदार, आमदारांच्या नावाचा वापर करत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नाहक दबाव आणत असल्याची चर्चाही प्राधिकरणात सुरू आहे. प्राधिकरणासारखी सरकारी यंत्रणा मोडकळीस आणणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्तव्यदक्ष खासदार, आमदारांनी लक्ष घालणे आवश्‍यक आहे.

काेराेनाचा बाजार थांबवा! युवकाचे जिल्हा रुग्णालयाबाहेर आंदाेलन

Complaint Of Shahupuri Citizens On Life Authority Over Water Bill Satara News

loading image