esakal | भूबाधित शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांकडून लूट
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

भूबाधित शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांकडून लूट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगवी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखी महामार्ग क्रमांक ९६५ बाळुपाटलाचीवाडी ते राजुरी या महामार्गावरील भूबाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू असून, बऱ्यापैकी शेतकऱ्यांना संपादित क्षेत्राचा मोबदला मिळाला आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग (National Highways) प्राधिकरणाशी संबंधित भूसंपादन अधिकारी मात्र, दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना (Farmer) जास्तीचा मोबदला लवकर मिळवून देण्याचे आमिष दाखवून भूबाधित शेतकऱ्यांकडून (Farmers) अनामत रक्कम उकळत असल्याच्या तक्रारी भूबाधित शेतकऱ्यांतून येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा: भू-राजकीय क्षेत्रातील स्थित्यंतराकडे

बाळूपाटलाचीवाडी ते राजुरी या ६० किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊन भूसंपादनाची भरपाई तातडीने देण्याची मागणी करत आहेत, तरीही मलिदा खायला सोकलेली प्रशासकीय यंत्रणा भूबाधित शेतकऱ्यांचे संपादनाची रक्कम जमा करण्यास विनाकारण विलंब करीत आहेत. जे शेतकरी या मध्यस्ती दलालांना अनामत रक्कम देत आहेत, अशा भूबाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला त्वरित देण्यात येत आहे. हा फंडा गेली कित्येक महिने सुरू असून, तेरी भी चूप मेरी भी चूप... मुळे सगळे फावत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

हेही वाचा: राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा ३१ कोटी ५२ लाखाचा मावेजा

हे सर्व प्रकार गुपचूपपणे सुरू असून, याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित भूसंपादन अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दलालांमार्फत मोठ्या प्रमाणावर माया गोळा करीत आहेत. यामुळे काही भूबाधित शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित क्षेत्राचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी भूबाधित शेतकऱ्यांनी केली आहे, तसेच संबंधित राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिकारी व संबंधित दलाल यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही भूबाधित शेतकऱ्यांनी केली आहे.

loading image
go to top