

Worker Opinions to Shape Congress Decisions; New Organisational Drive Announced
sakal
सातारा : तळागाळात काम करणारे कार्यकर्ते हेच काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर केला जाईल. राज्यात सुरू झालेले काँग्रेसचे संघटन सृजन अभियानात पहिल्या टप्प्यात जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी होत आहे. यासाठी नेत्यांच्या शिफारशींऐवजी कार्यकर्त्यांचा विचार घेतला जाईल व पक्षश्रेष्ठींकडे अहवाल पाठवला जाईल, अशी माहिती पक्षाचे केंद्रीय निरीक्षक व हिमाचल प्रदेशमधील इंदोराचे आमदार मलेंदर राजन यांनी दिली.